satyaupasak

Ajit Pawar : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; थेट एका शब्दात उत्तर देत दिला निर्वाळा

Ajit Pawar: बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली आणि पुढेही होईल, सरपंच संतोष देशमुख हत्येवर प्रतिक्रिया

पुणे: बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, विरोधक आणि बीडमधील लोकप्रतिनिधी सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांचे राजकारण लखलाभ असल्याचं सूचित करत, धनंजय मुंडेंचा राजीनामा राजकारणाचाच भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापूर्वीच सांगितलं होतं की, पुरावे हाती येईपर्यंत धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही. आज पुण्यात पत्रकारांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उपस्थित केला असता, अजित पवार काहीसे भडकले असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकरणाची एसआयटी आणि सीआयडीमार्फत चौकशी सुरू असल्याचं सांगितलं आहे. दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बीड प्रकरणात कोण दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि पुढेही होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर दिली.

Ajit Pawar: रिंग रोड बाबत लवकरच निर्णय, पुरंदर एअरपोर्ट व प्रकल्पांवर चर्चा सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिंग रोड संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाहतूक शिस्त पाळण्यासाठी पाच हजार रुपये दंड लावण्याचा विचार सुरू असून प्राथमिक चर्चा करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाच्या कामात व्यस्त आहेत आणि टोल, ट्रॅफिक गर्दी कमी करण्यासाठी काही टोल काढण्यात आले आहेत. उड्डाणपूल किंवा इतर उपाययोजना कशा करता येतील यावर चर्चा चालू आहे. रिंग रोड संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचीही माहिती दिली. तसेच, पुरंदर एअरपोर्टसंबंधी बैठक झाली असून, कुठेही एखादा प्रकल्प करताना लोकांचा विचार करणे आवश्यक आहे, यावरही पवार यांनी जोर दिला.

Ajit Pawar’s Advice on Political Photos During Baramati Visit

आजीत पवार यांनी बारामती दौऱ्यात कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे की, कोणत्याही राजकीय नेत्यासोबत फोटो घेत असताना सावधगिरी बाळगा. त्यांनी स्पष्ट शब्दांत कार्यकर्त्यांना सांगितले की, “आमच्या सोबत कोण फोटो घेतोय, याची काळजी घ्या. काही वेळा या फोटोंची किंमत मोजावी लागते. सध्या गर्दी वाढत आहे आणि सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. जर फोटो काढू दिला नाही, तर नाराजी होते आणि गडी बदलला, अशी स्थिती असू शकते.”

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *